Wednesday, 8 July 2015

Achala Fort

माझा  आधीचा ब्लॉग  वाचा.
Ramshej Fort रामशेज किल्ला 

  ॥   अचला किल्ला   ॥ 

भेटीची तारीख: ८ जुलै २०१५
Day 1: Fort 2


               आता आम्ही आमच्या पुढील मिशन अचलाच्या  दिशेने चालू लागलो.  हा किल्ला वणी पासून थोडे पुढे सापुताऱ्याच्या  दिशेने  आहे. आम्ही रामशेज सोडले आणि एका लहान रस्त्याला लागलो  जो नाशिक-वणी महामार्गाला  जोडत होता. दिंडोरी गावात आम्हाला गरज पडल्यास लागणारी काही औषध घ्यायची  होती. पण दुकाने अद्याप उघडलेली  नव्हती  म्हणून आम्ही वणीमधून औषधे घेण्याचे ठरवले. दिंडोरी नंतर एक लहान टी स्टॉलवर चहासाठी थांबलो. आम्ही चहाची  ऑर्डर दिली. तो माणूस  प्लास्टिक कप मध्ये चहा सर्व्ह  करत  होता. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला  प्लास्टिक कप मध्ये चहा नको. तेव्हा त्याने काचेच्या कपमध्ये आम्हाला चहा दिला. आणि नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्याने संदिपने त्याला प्लास्टिकचा  वापर कसा घातक आहे या वर एक लेक्चर दिले. खर तर ते बरोबरच होते कारण ग्रामीण लोकांना या बाबत जागरूक करणे आवश्यक आहे.  असो, चहा चांगला होता पण गोड होता. मग आम्ही ठरवले की प्रत्येक वेळेस चहाची ऑर्डर देतांना चहा  जास्त गोड नको हे आवर्जून सांगायला हवे. कारण या ग्रामीण भागात चहा फार गोड असतो.
    आम्ही चहा घेऊन वणी गाठले. लागणारी औषधे घेऊन मुक्कामाची विचारपूस केली. एक दुकानदार जो वणीच्या जगदंबा  मंदिरामध्ये  विश्वस्त होता , त्याने सांगितले की जगदंबा मंदिरात एक भक्तनिवास आहे जे  खरोखर स्वस्त आणि सुरक्षित आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आधि बुकींग करावे लगते. फोन वर पण बुकींग करता येते. आम्ही भेट देणाऱ्या सर्व किल्ल्यासाठी वणी हे मध्यवर्ति आणि  मोठे गाव असल्याने आम्ही वणी मध्येच रहायचे ठरवले आणि पुनः आमच्या ध्येयाच्या दिशेने निघलो.
   वणी पासून 14-15 किमी नंतर  आम्हाला  पिंपरीअंचला हे एक छोटेसे  गाव लागले.  खरतर तिकडूनच आम्हाला उजवीकडे वळायचे होते पण आमच्या ते लक्षात आले नाही. आम्ही पुढे निघून गेलो,  2-3 किमी नंतर आमच्या लक्षात आले की आम्ही रस्ता चुकलो आहोत . सुदैवानेआम्हाला एक जोडपे दिसले आम्ही त्यांना  अचला किल्ल्याचा रस्ता विचारला. त्यांनी आम्हाला पिंपरी गवातूनच उजवीकडे जायला संगीतले. संदिप गाडी पुन्हा माघारी वळवत होता. दरम्यान मी म्हटले  याच रस्त्याने थोडे पुढे हतगड नावाचा एक किल्ला आहे. अचानक संदीप माझ्यावर चिडला आणि म्हणाला ज्या दिशेने जायचेच नाही त्या बद्दल तू मला का सांगत आहेस आणि भांडण सुरु झाले. पण प्रदीपने लगेच मध्यस्थी केली आणि भांडण तिथेच मिटले.
   पिंपरी अंचला मधून उजवीकडे वळल्यानंतर पिंपरीपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लगले. तिथे आम्ही एका मुलाला गाईड बद्दल विचारले,त्याने काही नावे सुचवली पण  संदीपने  त्यालाच  किल्ला दाखवायला येणार का असे विचारले. माझ्या मनात पण अगदी हाच विचार आला होता. तो मुलगा पण तयार झाला त्याने सोबत अजून एका मुलाला घेतले. आम्ही त्याला पैस्यांबाबत विचारले. त्याने पैसे घेण्याचे नाकरले. आम्हाला तो मुलगा चांगला वाटला. आम्ही त्या दोघांना गाडीत बसवले आणि किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो.
 त्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळले की तो मॅरेथॉन धावतो आणि त्याने अनेक मॅरेथॉन जिंकल्या सुद्धा आहे. तो हाफ मॅरेथॉन (21Km) फक्त 1 तास आणि 10 मि अर्धा  पूर्ण करतो. आम्ही तिघे पण काही मॅरेथॉन मधे  धावलो आहोत. आमचे विशेषत: माझे १० किमिचे टायमिंग त्याच्या २१ किमी पेक्षाही जास्त आहे. सचिन आणि देवराम ही त्या दोघा मुलांची  नावे  होती. या पैकी सचिन मॅरेथॉन धावायचा. 5 मिनिटांत  आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. खरतर ते एक छोटस जंगलच आहे. आम्हाला मोरांचा ओरडण्याचा  आवाज ऐकू येत होत. देव कृपेने वन्य प्राण्याचा आला नाही. नाहीतर गिर्यारोहणाचा कार्यक्रम रद्द करुन घरी जावे लागले असते.  :)




आम्ही रस्त्याच्या कडेला झाडाखाली जंगलात गाडी पार्क करून चढाईला सुरुवात केली. आता सकाळचे १०.४० झाले होते. आम्ही  थोडे चढून गेल्यावर एका लहान मंदिरापाशी आलो. त्यावर एक पत्र्याचे छप्पर होते. इथून पुढे खडी चढाई होती. मला खूप थकल्यासारखे होत होते आणि मी सारखे ब्रेक घेत होते. आम्ही ६० अंशाहुन अधिक अशी चढाई करत होतो. एका ठिकाणी सर्व पुढे निघून गेले. तसे ते नजरेच्या टप्प्यातच होते. पण पावसाळ्यामुळे पायवाटेवर गवत उगवल्यामुळे नक्की कुठून चढावे ते कळत नव्हते. शेवटी मी संदिपला आवाज दिला. तो पुन्हा माझ्या मदतीसाठी खाली आला. पाऊस पडला नव्हता तरी वाट खूप निसरडी होती. संदीपने मला हाताला धरून वर ओढले पण माझा पाय निसटला आणि मी खाली पडले. सुदैवाने कोणीही पाहिले नाही आणि संदीपजवळ त्या वेळी  कॅमेरा नव्हता अन्यथा त्याने माझा स्नॅप क्लिक केला असता. माझी फजीती होता होता वाचली.
 थोडे पुढे चढून गेल्यानंतर आम्ही एका  लहान गुहेपाशी आलो.  मी गुहेच्या अगदीजवळ गेले नाही कारण तिथे लहान रॉक क्लाइंबिंग पॅच होता आणि मी खूप थकल्यासारखी झाले होते म्हणून मी पाणी ब्रेक घेतला आणि बाकीच्यानी फोटो ब्रेक. पाणी पितांना मी आजूबाजूचा परिसर न्याहाळत होते. किल्ल्याखालचे पाडे अगदीच पिटुकले दिसत होते. संपूर्ण परिसर हिरवागार होता. भाताची पोपटी शेते खुप सुंदर दिसत होती. या सुंदर अचला किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर एक  ही मोठे झाड नाही तरीही किल्ल्यावर पूर्ण हिरवे आच्छादन आहे. माझ्या कल्पनाविश्वातून भानावर आले तोवर बाकीच्यांचे फोटोसेशन पण आटोपले होते.








गुहेपासून आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली आणि आता आम्हाला पायऱ्या लागल्या  होत्या.  या वर शेवाळे असल्याने पायऱ्या चढताना काळजी घ्यावी. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आम्ही गडामाथ्यावर १२ वाजता  आलो. विलोभनीय वातावरण होते. आम्ही जवळजवळ ढगात होतो. खूप वारा होता. वर दोन प्राचीन पाण्याचे टाके आहे. त्यापैकी एकात  पाणी भरले आहे आणि दूसरे कोरडे होते. पाण्याच्या टाक्याबद्दल देवरामने सांगितले की या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचारोग बरे होतात. बरेच लोक इकडे आंघोळीसाठी येतात. त्याची कल्पना आम्हाला तिकडे टाकून दिलेल्या कपड्यांवरून आलीच. आम्हाला तिथे शेंदुर लावलेला  एक मोठा दगड दिसला. सात फुट असा उंच दगड होता तो.  किल्ल्याच्या  सर्व टोकाला जाऊन आम्ही फोटो  क्लिक केले. आम्ही वाऱ्याच्या शक्तिचा अनुभव घेत होतो. वाऱ्यामुळे आम्ही सरळ उभे राहु शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही कड्याच्या अगदी टोकावर जाणे टाळले.
  अचानक तो पाऊस सुरु झाला आणि आम्हाला आसरयासाठी काही न मिळाल्याने आम्ही चिंब भिजलो. जरा सर ओसरल्यावर आम्ही किल्ल्याचे दूसरे टोक बघायला निघलो. आम्ही जवळचे काही चॉकलेटस  खाल्ले. सचिन आणि देवरामला आम्ही या किल्ल्याचा इतिहास विचारला. त्यांनासुद्धा तो माहित नव्हता. पण त्यांनी हे सांगितले की शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटून आणली तेव्हा ते याच डोंगर रांगेतुन गेले होते. शिवाय त्यांनी  सर्व संपत्ती हतगड या किल्ल्यावर ठेवली होती. शिवाय त्यांनी अशी माहिती दिली की  किल्ला खरोखर  पाहण्यासाठी खुप चांगला  आहे आणि तुम्ही आजच कव्हर करू शकता. मी रागाने संदीप कडे पाहिले तो माझ्याकडे पाहून हसत होता. किल्ल्यावर पर्यंत गाडी जाऊ शकते असे सुद्धा आम्हाला सांगितले. आम्ही म्हणालो खाली जाऊन बघु.










आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. मला उतराना जरा भीती वाटत होती म्हणून मी जरा लहान पावले टाकत होते. संदीप जाम चिडला माझ्यावर, म्हणाला की तू ट्रेक वर येऊ नको पुन्हा. प्रदीपने खाली उतरतांना पाय कसा टाकावा ते शिकवले नंतर मलाही आत्मविश्वास आला आणि मी पण जोरात उतरू लागले. नंतर आम्ही पुन्हा  मंदिरापाशी खाली आलो. कार पर्यंत पोहोचण्यास जवळपास 15 मि लागणार होते आणि  दुपारचे १.३० वाजून गेले  होते. आम्हाला खूप  भूक पण लागली होती.आम्हाला लंच साठी माझ्या आईने  पॅक करून काही पराठे दिले होते ते खाल्ले. सोबत तिने दिलेले लोणचे, मुरंबा यांचाही आनंद घेतला.
 जेवणानंतर  आम्ही दुपारी २ ला गाडी पाशी पोहोचलो. पुरेसा वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही हतगडला पण जायचे ठरवले. एकाच दिवशी तीन किल्ले या विचाराने आम्ही खुप आनंदात होतो.





 पोहोचण्याच्या वाटा 


आम्ही दुसऱ्या दिवशी अहिवंत या किल्ल्याला भेट देणार आहोत असे सचिन आणि देवराम यांना सांगितले.
त्यांना सहज विचारले उद्या आमच्या सोबत येणार का? ते आनंदाने तयार झाले. आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशीचा लंच आणण्यासाठी विचारले. ते पैसे घ्यायला तयार नसल्याने, आम्ही विचार केला  की  निदान या मार्गाने तरी त्यांना मदत करु शकू. उद्याची भेटण्याची वेळ ठरवून आम्ही त्यांचा निरोप घेतला,

आता पुढील ब्लॉग मधे वाचा आमचा तिसरा किल्ला हतगड . . .

Hatgad Fort किल्ले हतगड


Main page मुख्य पान 

3 comments:

  1. Excellent Adventure Sandip & Dhanashree. Excellent narration.
    Enjoy your passion to the fullest.

    ReplyDelete